भेट प्रती पंढरपूर ला.
मित्रांनो,
जर तुम्हाला भटकंतीची आवड असेल आणि तुम्हाला जर एखाद्या शांत, प्रसन्न ठिकाणी भेट द्यायची असेल तर मी सुचवेन कि तुम्ही प्रती पंढरपूर ला नक्की भेट द्यावी.. तुम्हाला जर खरोखर मनाला एकाग्र करायचे असेल आणि निर्मळ निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर १००% हि जागा तुमच्या साठी आहे.. परंतु तुम्ही जर फक्त पिकनिक म्हणून बघत असाल तर मग .. मी सुचवेन कि दुसरा एकदा गोंगाट असलेले ठिकाण निवडा...
एका दिवसात पूर्ण होतील असे तीन ठिकाण आहेत ते म्हणजे पवना ड्याम, प्रती पंढरपूर आणि लोह्गढ...
प्रती पंढरपूर(चैत्र धाम मंदिर ) हे दुधिवरे खिंड येथे आहे.. तुम्हाला जायचे असल्यास मुंबई पुणे ओल्ड हायवे ला यावे लागेल .. मग तुम्हाला कामशेत गाव लागेल .. जर तुम्ही पुण्याकडून जात असाल तर कामशेत गावाच्या तुमच्या डाव्या हाताला एक कमान लागेल .. त्या कमानीतून सरळ पुढे जात राहा.. तो रस्ता सरळ सरळ तुम्हाला घेऊन जाईल "पवना ड्याम" ला ...
पवना ड्याम : कामशेत पासून १९ किमी असेलेल पवना ड्याम हे खूप सुंदर ठिकाण आहे.. भौगोलिक दृष्ट्या ह्या ड्याम चे महत्व तर आहेच कारण ह्याच ड्याम मधून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो पण एक पिकनिक स्पोट म्हणून पण खूप छान जागा आहे.
पवना ड्याम येथे काही रेसोर्ट्स पण आहेत .. त्यामुळे तुम्ही तिथे पोटोबा करू शकतात परंतु प्रामाणिक पणे संगच्य्हा म्हटला तर महाग आहेत ती रेसोर्ट्स..
विस्तृत असा पसरलेल्या पवना ड्याम चे सौंदर्य काही वेगळेच आहे .. तुम्ही जर सकाळी लवकर पोहचला इथे तर थंड गार वारा तुमच्या शरीराला स्पर्श करतो आणि समोर पवानाच्या पान्यात पडणार्या कोवळ्या सुर्य किर्नामुळे चमकणारे पाणी बघताना तुम्हाला खूप मजा येईल.. फक्त पवनाचे पाणीच नाही तर आजू बाजूचा हिरवागार निसर्ग सुधा तुम्हाला आकर्षित करतो..
इथे तुम्हाला वाटर रायीड्स पण करता येतात .. त्यामुळे बोटीत बसून तुम्ही पाण्याचा आणि निसर्गाचा येतेच्ह आनंद लुटू शकतात .. फोटो काढण्याची आवड असणार्यांना तर निसर्गाने पर्वणीच दिली आहे इथे... पवना ड्याम येथे मी काढलेले काही फोटोस....
पवना ड्याम च्या निसर्गाचा आंनंद लुटून झाल्या नंतर तुम्ही त्याच रोडने सरळ पुढे गेलात कि साधारणता ८ किमी वर तुम्हाला डाव्या हाताला एका मंदिराचा घुमट दिसेल .. आणि ते मंदिर म्हणजेच चैत्राधाम मंदिर किवा प्रती पंढरपूर ....
प्रती पंढरपूर :
ह्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला गाडी लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्द असते .. त्याचे कारण म्हणजे ह्या मंदिरात फारशी वर्दळ नसते.. आणि त्याच करणा मुले तुम्हाला हवी असलेली शांतता येथे अनुभवायला मिळते ... तुम्ही जर गेलात तर तुम्हाला लक्ष्यात येईल कि ह्या मंदिराच्या बाहेर एकही दुकान नाही .. ना खाद्य पदार्थाचा .. ना पूजेच्या वस्तूंचा .. थोडक्यात सांगायचा तर ह्या मंदिराचा अजून बाजारीकरण झालेला नाही आणि तेच ह्या ठिकाणाचा वैशिष्ट्य आहे.
मंदिराच्या गेट मधून आत गेल्यावर तुम्हाला रस्त्याच्या दोघा बाजूला छान छान फुलझाडे बघायला मिळतील.. थोडा चालत गेल्यावर समोरच डाव्या बाजूला भव्य असे मंदीर दिसेल.. मंदिराच्या बाहेर पादत्राणे काढण्यासाठी खास सोय केली आहे .. कृपया समंजस पणे आपली पादत्राणे तिथेच काढा.. त्याच्या बाजूला पिण्याचा पाण्याची सोय आहे .. मस्त थंड थंड पाण्याचा आस्वाद घेत येतो तुम्हाला आणि पाय धुण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी पण तिथे एक छोटासा नळ आहे..
मस्त पैकी फ़्रेश झाल्यावर समोर बघा .. सुंदर असा मंदिर दिसेल तुम्हाला ... साधारणता २० पायर्या चढून जावे लागेल तुम्हाला ... पायर्या चढून गेल्यावर समोरच तुम्हाला मोठा गाभारा दिसेल मंदिराचा .. पण मंदिरात प्रवेश करण्याधी बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला गणपती आणि हनुमानाचे दर्शन घ्या.. नंतर मंदिराच्या गाभार्यात प्रेवेश केल्यावर क्षणात तुमच्या लक्ष्यात येईल कि मंदिरात प्रेवेश केल्या बरोबर तुमचा थकवा उडण छु झाला ...
गाभार्यात प्रेवेश केल्याबरोबर तुम्हाला समोर विठ्ठल रुखमाई .. चे मंदिर दिसेल .. आणि एका बाजूला श्री राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचं एक मंदिर आहे आणि दुसर्या बाजूल श्री कृष्ण आणि राधा
अतिशय सुबक अश्या मुर्त्या आहेत ह्या .. दर्शन घेऊन झाल्यावर शांतपणे डोळे मिटून खाली एकाग्र मनाने बस आणि बघा निसर्गाच्या खर्या रूपाचा दर्शन होते कि नाही .. तुम्ही जर एकाग्र मन करून बसलात तर तुम्हाला पाखराची किलबिल एकदम स्पष्टपणे आइकु येईल.. कि ज्या किलबिल मध्ये दुसरा कुठलाच कृत्रिम आवाज नसेल .. अशी पक्ष्यांची किलबिल तुम्हाला आपल्या शहरात नाही ऐकू येणार .. तो सुळसुळ करणारा वारा आणि पक्षांची किलबिल ऐकण्यात तुम्ही नक्कीच दंग होणार याची मला खात्री आहे ...
त्या शांततेचा मनमुराद आनंद लुटल्या नंतर तुम्हाला मंदिराचे आतून केलेले नक्षीकाम बघता येईल ... खूप सुंदर असे नक्षीकाम आहे त्याच बरोबर मंदिराचा मधोमध खूप मोठा काचेचा झुंबर आहे ... तो अवश्य बारकाईने बघा.. ते झाल्यावर मंदिराच्या बाहेर चे पण नक्षीकाम बघण्य सारखे आहे .. त्याच बरोबर मंदिराच्या बाहेर आल्यावर तिथे एक छान असा बगीचा पण आहे .. तिथे तुम्ही छान छान फोटो काह्धू शकता ...
मंदिराच्या खाली उतरल्यावर खालच्या बाजूला अजून एक मंदिर आहे.. म्हणजे हे मंदीर दोन ताली आहे .. खालच्या बाजूला संतांचे मंदिर आहे.. खूप रेखीव प्रतिकृती आहेत त्या पण ... दर्शन झाले असेल तर मंदिराच्या समोरील बाजूस एक मोठे आवर आहे .. खाली छान असे गावात आहे आहे आणि आजू बाजूला बसण्यासाठी बाक आहेत .. तुम्ही जर डबे घेऊन गेला असाल तर इथे तुम्हाला डबे खत येतील पण कृपया घाण होणार नाही याची काळजी घ्या ...दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत येथे महाप्रसाद पण असतो .. त्याची चौकशी तुम्ही मंदिरात करू शकतात ... आणि हो येथे राहण्यासाठी पण व्यवस्था आहे त्याची पण चौकशी मंदिरात करू शकतात ...
खरोखर हे मंदिर माझ्या आवडी तल्या ठिकाणातील एक आहे .. मी दर वर्षी माझ्या वाढ दिवसाला ह्या मंदिरात दर्शनासाठी जातो...
चैत्राधाम मंदिराचे मी काढलेले काही फोटोस ....
मंदिराचे दर्शन झाल्यावर आता इथून निघायला हरकत नाही कारण पुढे आपल्याला अजून एका छान ठिकाणी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे लोहगड....
मंदिरातून बाहेर निघाल्यावर डाव्या हाताला रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ पुढे चला.. साधरणता ५-६ किमी गेल्यावर उजव्या हाताला एक रस्ता लागेल त्या रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर तुम्हाला लोहगड चा पायथा लागेल... तिथे तुमची कार किवा बायिक पार्क करून तुम्ही पायी गडावर जाऊ शकतात.
गडाच्या पायथ्याशी खाण्या पिण्याची व्यवस्था असते, वरती जाताना बरोबर पुरेसे पाणी असू द्या .. कारण गड चढून गेल्यावर तुम्हाला खूप तहान लागते...फक्त एक काळजी घ्या कि गडावर कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्या...
लोहगडावर काही फोतोस ....
मित्रानो अश्या प्रकारे तुम्ही एका दिवसात तीन छान आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतात...

No comments:
Post a Comment