Tuesday, January 5, 2016

Visit to Durga Tekdi in Nigdi

The tekdi (hill) derives its name from the Durga temple on the hill. Durga tekdi is a small hill in Nigdi Pune, its a very popular place for nearby situated people. People use to go for morning walk and jogging.

here you will see Plants such as rain tree, Pelthohorum, Ficus, Neem, Glyricidia, Suru, Sisoo, Kasid, Subabul etc

 

The best season to visit here is a monsoon or winter,  I visited here at December it means it was a winter. It was  Saturday so plenty of people were there to enjoy their weekend.


people like to spend couple of hours or a more than that at this place. Cause the environment is so pleasant.

Threre is lot of space for you to sit and talk. People comes with family and play some games like loodo, bandminton, chess, and many more.

We also enjoyed the badminton for couple of hours...

Another attraction of this place is there is a an amusement park, Indira Gandhi Udyan (Appu Ghar), which is built on the lines of Appu Ghar in Delhi.

so if you visit this place you get a chance to feel natural climate as well as some fun at park.

at appu ghar there are few rides they are not too big size but you can enjoy them with your family. Specially if you do have kids then its worth to visit there.

for appu ghar there is entry fee of rs 30 (till to Dec 2015)  and you will need to pay extra for the rides inside. they are mostly 40rs per ride (till to Dec 2015).

another option is that you can buy a combo pack of rs 300 including entry and all rides, but I won't recommend it as few rides are too small that you wont want to sit on them so buying a seperate ticket is recommended.

Overall, its a good place to spend few hours with your family and friends.


Few pics taken at durga tekdi...




Sunday, January 3, 2016

भेट प्रती पंढरपूर ला

भेट प्रती पंढरपूर ला.

मित्रांनो,

जर तुम्हाला भटकंतीची आवड असेल आणि तुम्हाला जर एखाद्या शांत, प्रसन्न ठिकाणी भेट द्यायची असेल तर मी सुचवेन कि तुम्ही प्रती पंढरपूर ला नक्की भेट द्यावी.. तुम्हाला जर खरोखर मनाला एकाग्र करायचे असेल आणि निर्मळ निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर १००% हि जागा तुमच्या साठी आहे.. परंतु तुम्ही जर फक्त पिकनिक म्हणून बघत असाल तर मग .. मी सुचवेन कि दुसरा एकदा गोंगाट असलेले ठिकाण निवडा...

एका दिवसात पूर्ण होतील असे तीन ठिकाण आहेत ते म्हणजे पवना ड्याम, प्रती पंढरपूर आणि लोह्गढ...

प्रती पंढरपूर(चैत्र धाम मंदिर ) हे दुधिवरे खिंड येथे आहे.. तुम्हाला जायचे असल्यास मुंबई पुणे ओल्ड हायवे ला यावे लागेल .. मग तुम्हाला कामशेत गाव लागेल .. जर तुम्ही पुण्याकडून जात असाल तर कामशेत गावाच्या तुमच्या डाव्या हाताला एक कमान लागेल .. त्या कमानीतून सरळ पुढे जात राहा.. तो रस्ता सरळ सरळ तुम्हाला घेऊन जाईल "पवना  ड्याम" ला ...

पवना ड्याम : कामशेत पासून १९ किमी असेलेल पवना ड्याम हे खूप सुंदर ठिकाण आहे.. भौगोलिक दृष्ट्या ह्या ड्याम चे महत्व तर आहेच कारण ह्याच ड्याम मधून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो पण एक पिकनिक स्पोट म्हणून पण खूप छान जागा आहे.

पवना ड्याम येथे काही रेसोर्ट्स पण आहेत .. त्यामुळे तुम्ही तिथे पोटोबा करू शकतात परंतु प्रामाणिक पणे संगच्य्हा म्हटला तर महाग आहेत ती रेसोर्ट्स..

विस्तृत असा पसरलेल्या पवना ड्याम चे सौंदर्य काही वेगळेच आहे .. तुम्ही जर सकाळी लवकर पोहचला इथे तर थंड गार वारा तुमच्या शरीराला स्पर्श करतो आणि समोर पवानाच्या पान्यात पडणार्या कोवळ्या सुर्य किर्नामुळे चमकणारे पाणी बघताना तुम्हाला खूप मजा येईल.. फक्त पवनाचे पाणीच नाही तर आजू बाजूचा हिरवागार निसर्ग सुधा तुम्हाला आकर्षित करतो..

इथे तुम्हाला वाटर रायीड्स पण करता येतात .. त्यामुळे बोटीत बसून तुम्ही पाण्याचा आणि निसर्गाचा येतेच्ह आनंद लुटू शकतात .. फोटो काढण्याची आवड असणार्यांना तर निसर्गाने पर्वणीच दिली आहे इथे... पवना ड्याम येथे मी काढलेले काही फोटोस....













पवना ड्याम च्या निसर्गाचा आंनंद लुटून झाल्या नंतर तुम्ही त्याच रोडने सरळ पुढे गेलात कि साधारणता ८ किमी वर तुम्हाला डाव्या हाताला एका मंदिराचा घुमट दिसेल .. आणि ते मंदिर म्हणजेच चैत्राधाम मंदिर किवा प्रती पंढरपूर ....

प्रती पंढरपूर :

ह्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला गाडी लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्द असते .. त्याचे कारण म्हणजे ह्या मंदिरात फारशी वर्दळ नसते.. आणि त्याच करणा मुले तुम्हाला हवी असलेली शांतता येथे अनुभवायला मिळते ... तुम्ही जर गेलात तर तुम्हाला लक्ष्यात येईल कि ह्या मंदिराच्या बाहेर एकही दुकान नाही .. ना खाद्य पदार्थाचा .. ना पूजेच्या वस्तूंचा .. थोडक्यात सांगायचा तर ह्या मंदिराचा अजून बाजारीकरण झालेला नाही आणि तेच ह्या ठिकाणाचा वैशिष्ट्य आहे.

मंदिराच्या गेट मधून आत गेल्यावर तुम्हाला रस्त्याच्या दोघा बाजूला छान छान फुलझाडे बघायला मिळतील.. थोडा चालत गेल्यावर समोरच डाव्या बाजूला भव्य असे मंदीर दिसेल.. मंदिराच्या बाहेर पादत्राणे काढण्यासाठी खास सोय केली आहे .. कृपया समंजस पणे आपली पादत्राणे तिथेच काढा.. त्याच्या बाजूला पिण्याचा पाण्याची सोय आहे .. मस्त थंड थंड पाण्याचा आस्वाद घेत येतो तुम्हाला आणि पाय धुण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी पण तिथे एक छोटासा नळ आहे..

मस्त पैकी फ़्रेश झाल्यावर समोर बघा .. सुंदर असा मंदिर दिसेल तुम्हाला ... साधारणता २० पायर्या चढून जावे लागेल तुम्हाला ... पायर्या चढून गेल्यावर समोरच तुम्हाला मोठा गाभारा दिसेल मंदिराचा .. पण मंदिरात प्रवेश करण्याधी बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला गणपती आणि हनुमानाचे दर्शन घ्या.. नंतर मंदिराच्या गाभार्यात प्रेवेश केल्यावर क्षणात तुमच्या लक्ष्यात येईल कि मंदिरात प्रेवेश केल्या बरोबर तुमचा थकवा उडण छु झाला ...

गाभार्यात प्रेवेश केल्याबरोबर तुम्हाला समोर विठ्ठल रुखमाई .. चे मंदिर दिसेल .. आणि एका बाजूला श्री राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचं एक मंदिर आहे आणि दुसर्या बाजूल श्री कृष्ण आणि राधा

अतिशय सुबक अश्या मुर्त्या आहेत ह्या .. दर्शन घेऊन झाल्यावर शांतपणे डोळे मिटून खाली एकाग्र  मनाने बस आणि बघा निसर्गाच्या खर्या रूपाचा दर्शन होते कि नाही .. तुम्ही जर एकाग्र मन करून बसलात तर तुम्हाला पाखराची किलबिल एकदम स्पष्टपणे आइकु येईल.. कि ज्या किलबिल मध्ये दुसरा कुठलाच कृत्रिम आवाज नसेल .. अशी पक्ष्यांची किलबिल तुम्हाला आपल्या शहरात नाही ऐकू येणार .. तो सुळसुळ करणारा वारा आणि पक्षांची किलबिल ऐकण्यात तुम्ही नक्कीच दंग होणार याची मला खात्री आहे ...

त्या शांततेचा मनमुराद आनंद लुटल्या नंतर तुम्हाला मंदिराचे आतून केलेले नक्षीकाम बघता येईल ... खूप सुंदर असे नक्षीकाम आहे त्याच बरोबर मंदिराचा मधोमध खूप मोठा काचेचा झुंबर आहे ... तो अवश्य बारकाईने बघा.. ते झाल्यावर मंदिराच्या बाहेर चे पण नक्षीकाम बघण्य सारखे आहे .. त्याच बरोबर मंदिराच्या बाहेर आल्यावर तिथे एक छान असा बगीचा पण आहे .. तिथे तुम्ही छान छान फोटो काह्धू शकता ...

मंदिराच्या खाली उतरल्यावर खालच्या बाजूला अजून एक मंदिर आहे.. म्हणजे हे मंदीर दोन ताली आहे .. खालच्या बाजूला संतांचे मंदिर आहे.. खूप रेखीव प्रतिकृती आहेत त्या पण ... दर्शन झाले असेल तर मंदिराच्या समोरील बाजूस एक मोठे आवर आहे .. खाली छान असे गावात आहे आहे आणि आजू बाजूला बसण्यासाठी बाक आहेत .. तुम्ही जर डबे घेऊन गेला असाल तर इथे तुम्हाला डबे खत येतील पण कृपया घाण होणार नाही याची काळजी घ्या ...दुपारी  १२ ते २ वाजे पर्यंत येथे महाप्रसाद पण असतो .. त्याची चौकशी तुम्ही मंदिरात करू शकतात ... आणि हो येथे राहण्यासाठी पण व्यवस्था आहे त्याची पण चौकशी मंदिरात करू शकतात ...

खरोखर हे मंदिर माझ्या आवडी तल्या  ठिकाणातील एक आहे .. मी दर वर्षी माझ्या वाढ दिवसाला ह्या मंदिरात दर्शनासाठी जातो...

चैत्राधाम मंदिराचे मी काढलेले काही फोटोस ....







मंदिराचे दर्शन झाल्यावर आता इथून निघायला हरकत नाही कारण पुढे आपल्याला अजून एका छान ठिकाणी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे लोहगड....

मंदिरातून बाहेर निघाल्यावर डाव्या हाताला रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ पुढे चला.. साधरणता ५-६ किमी गेल्यावर उजव्या हाताला एक रस्ता लागेल त्या रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर तुम्हाला लोहगड चा पायथा लागेल... तिथे तुमची कार किवा बायिक पार्क करून तुम्ही पायी गडावर जाऊ शकतात.

गडाच्या पायथ्याशी खाण्या पिण्याची व्यवस्था असते, वरती जाताना बरोबर पुरेसे पाणी असू द्या .. कारण गड चढून गेल्यावर तुम्हाला खूप तहान लागते...फक्त एक काळजी घ्या कि गडावर कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्या...

लोहगडावर काही फोतोस ....

















मित्रानो अश्या प्रकारे तुम्ही एका दिवसात तीन छान आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतात...

Wednesday, December 9, 2015

भटकंती लक्ष्मी रोड ची....



खर म्हणजे लक्ष्मी रोड विषयी जेवढा लिहावा तेवढ कमीच असणार आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा ..... माझ्या मते लक्षी रोड म्हणजे पुण्यातील एक आकर्षक आणि नेहमी वर्दळ असलेले ठिकाण म्हणजे लक्ष्मी रोड ....

माझ्या मते अशी एखादी पण गोष्ट नसेल कि जी तुम्हाला लक्ष्मी रोड ला मिळणार नाही... लक्षी रोड ला भेट देण्यामाघे लोकांचे भरपूर कारण असतात त्यात महत्वाची म्हणजे कपड्यांची खरेदी.. ज्यांना कपड्यांची खरेदी करायला आवडते असे लोक लक्षी रोड ला प्रमुखाय्ने पसंती देतात...दुसरे सगळ्यात महत्वाचा कारण म्हणजे तिथे जवळच सगळ्यांचे आद्य दैवत श्री गणेशाचे मंदिर आहे..ते म्हणजे श्री दगडू शेट ह्वाल्वाई गणपती मंदिर... एक जागृत आणि प्रतीष्टेचे देवस्थान म्हणून ख्याती आहे ह्या मंदिराची.. गणेश चतुर्थीला तर ह्या मंदिरात श्रद्धा लुंची खूपच गर्दी असते... महत्वाचे म्हणजे हे मंदिर खूप वर्दळ आणि गजबजलेल्या ठिकाणी आहे परंतु तरी पण भाविक मात्र दर्शन घेण्यासाठी रांग लाऊन दर्शन घेतात... बाप्पाचीच कृपा म्हणावी कि लोकांना तिथल्या गर्दीचा फारसा त्रास जाणवत नसावा.
दुसरा महात्वाच्चा ह्या परिसरातील आकर्षण म्हणजे अ ब चौक .. अप्पा बळवंत चौक .. अ ब चौक प्रसिद्ध आहे ते म्हणजे पुस्तकासाठी .. अजून बर्याच गोष्टी आहेत पण महत्वाचे आकर्षण म्हणजे पुस्तके .. माझ्या मते जगातील असे कोणतेच पुस्तक नसेल कि ते तुम्हाला इथे मिळणार नाही... जुन्यात जुने आणि नव्यात नवे पुस्तक तुम्हाला इथे सहज मिळू शकते...विद्यार्थी आणि वाचनाची आवड असणारे लोक ह्या परिसरात गेले म्हणजे अ ब चौक ला नक्कीच भेट देतात..
आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे तो म्हणजे लक्ष्मी रोड...लक्षी रोड ला खरी मशागत असते ती म्हणजे पार्किंग ची ... लक्ष्मी रोड ला गेल्यावर जर तुम्हाला लगेच पार्किंग मिळाली तर तुम्ही स्वताला भाग्यशाली समजायला हरकत नाही.. वयक्तिक मला वाटता कि शनिवार वाड्याजवळ गेल्यावरच प्रत्येकाच्या मनात एकाच प्रश्न येत असेल कि पार्किन मिळेल का..

जसा माझा अनुभव आहे काही लोक गर्दीच्या ठिकाणात पण आनंद लुटतात आणि काहींनी अशी वर्दळ दगदगीची होते मी पण दुसर्या प्रकारातील आहे ..खरं म्हणजे मला गर्दीचे ठिकाण मुळीच नाही आवडत .. पण काही वेळा मित्रांच्या आग्रहाखातर जावे लागते लक्ष्मी रोड ला. तिथे गेल्यावर जर तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर तुमच्या लक्ष्यात येईल कि हीच ती जागा जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे  लोक भेटू शकतात किवा दिसू शकतात... परंतु तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पण त्या गर्दीचाच भाग होणे गरजेचे आहे ... कुणी त्याला हवे असलेले दुकान शोधत असतो.. सापडले नाही तर याला त्याला विचारून आपले काम भागवत असतो.. काही लोकांची खरेदी झालेली असती त्यामुळे त्यांची पाऊले आपल्या गाडीकडे किवा पीएमटी कडे वेगाने जात असतात .. कारण हातात ओझे असते. थोडे थकलेले दिसतात परंतु आपल्याला हवे असलेले कपडे किवा वस्तू मिळाल्याचा आनंद पण त्यांच्या चेहऱ्यावर असतो.. काही झन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात...कारण लक्षी रोड वर भेल, जूस, काकडी अश्या बर्याच गोष्टींचे ठेले दिसतील तुम्हाला ... ह्या सगळ्या गर्दीतून सावकाश पणे भली मोठी पी एम टी ची बस काढताना बस चालकाची कसरत पण तुम्हाला बघायला मिळेल.. नकळत बस मध्ये बसलेल्या लोकांना वाटते कि का उगाच लोक बायिक आणतात आणि गर्दी करतात आणि बायिक वाल्य्ना वाटका कि का हि पी एम टी  येवढ्या लहान रस्त्यावरून जाते.. पण असो त्याला पर्याय नाही .. रोज करोडो ची उलाढाल होणार्या लक्षी रोड ला एकदा तरी भेट देऊन तुमचा अनुभव नक्की बघा...

आणि हो एक महत्वाचा आकर्षण ह्या परीसारतील सांगायचा मी विसरलो ... विसरलो म्हणजे मी मुद्दाम राखीव ठेवला ते .. आणि ते म्हणजे "तुळशी बाग ".. मुळात तुळशी बागेची एक वेगळेच अस्तित्व आणि महत्व आहे .. म्हणून त्यासाठी मी एक वेगळा लेख लिहणार आहे लवकरच ...

वेळ दिल्याबद्दल आणि माझे विचार आणि अनुभव वाचल्याबद्दल धन्यवाद...